
मूळचे नाशिकचे असणांर्या राजीव पाटील यांचा जन्म २७ मार्च १९७२ सालचा. यांनी अभियांत्रिकीचे पर्यंतचं शिक्षण घेतले होते. नाटकाची आवड असणार्या पाटील यांनी नाशिकच्या प्रयोग परिवार या नाट्यसंस्थेच्या नाटकांमधील त्यांच्या कारकिर्दीस सुरुवात केली. अतुल पेठे यांच्यासमवेत हौशी रंगभूमीवर पदार्पण केले. “प्रेमाची गोष्ट” , “हॅलो इन्स्पेक्टर” , या नाटकांसाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. शाम मनोहर यांच्या नाटकाचं सादरीकरण पटील यांनी केलं. याचं सादरीकरणं मुंबई तसंच दिल्लीच्या नाट्यमहोत्सवात देखील करण्यात आली. त्यानंतर ते मराठी चित्रपटसृष्टीत कारकीर्द घडवण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले,व त्यांनी अमोल पालेकर, चंद्रकांत कुलकर्णी अश्या नामवंत दिग्दर्शकांकडे साहाय्यक म्हणून काम केले.
आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून पाटील यांनी गावरान विषय, सामाजिक प्रश्न तसंच वास्तवता मांडली. ‘सावरखेड-एक गाव’ , ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘पांगिरा’, ‘सनई चौघडे’, ‘ऑक्सिजन’, ‘ब्लाईंड गेम’; असे वैविध्यपूर्ण विषय दिग्दर्शित करुन प्रेषकाचं पुरेपूर मनोरंजन होईल याची खात्री घेतली.
२०१० सालच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर ‘जोगवा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा बहुमान मिळवला. तसंच राज्य शासनाचे देखील अनेक पुरस्कार मिळवले.
“बेधुंद मनाच्या लहरी”, “पिंपळपान” या मालिकांचे पटकथा व संवाद सुध्दा त्यांनी लिहीले होते. अखेरच्या दिवसांमध्ये पाटील “वंशवेल” नावाच्या मराठी चित्रपटावर काम करत होते; राजीव पाटील यांचा दिग्दर्शक म्हणुन हा शेवटचा चित्रपट ठरला. “वंशवेल’ च्या माध्यमातून एकाच चित्रपटात अठरा कलाकार एकत्र आणण्याचा अनोखा प्रयोग पाटील यांनी केला. वयाच्या ४२ व्या वर्षी म्हणजे ३० सप्टेंबर २०१३ रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
( लेखन व संशोधन – सागर मालाडकर )
Leave a Reply