केवटे, राम

यवतमाळ मधील राणी अमरावती ह्या छोट्याशा गावातून आलेले राम केवटे हे एक प्रसिद्ध चित्रकार असून आज त्यांचे ह्या क्षेत्रात फार मोठे नाव आहे. मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून पदवी प्राप्त करुन नंतर ते अमेरिकेत “फिलाडेल्फिया” कॉलेज ऑफ आर्ट” “युनायटेड नेशन्स फेलोशिप” अंतर्गत ग्राफीक्स चे शिक्षण घेतले. त्यांच्या चित्रांवर पाब्लो पिकासोचा प्रभाव जाणवतो. मुंबईत परत आल्यावर त्यांनी स्वत:चे पहिले प्रदर्शन पंडोल आर्ट गॅलरी मधे “Homega to the circle” नावाने भरविले. वूड नोट्स ह्या कला प्रकारात त्यांनी अल्पावधीतच त्यांनी महारत मिळवली आणि १९९० मधे जहांगीर आर्ट गॅलरी मधे ह्यावर प्रदर्शन भरवले. त्यांनी जगातील विविध प्रसिद्ध संग्रहालयांना भेट दिली आहे.

राम केवटे ह्यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करणयात आले आहे. ज्यात कर्नाटक चित्रकला परिषद (बंगलोर) १९७७, कर्नाटक राज्य कला प्रदर्शनात पुरस्कार, हैद्राबाद आर्ट सोसायटी तर्फे पुरस्कार प्राप्त. त्यांना युनायटेड नेशन्स कडून फेलोशिप मिळाली असून सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून फेलोशिप प्राप्त. मुंबई राज्य प्रदर्शनात सहभाग, मुंबई आर्ट सोसायटीकडून १९५९, १९६० आणि १९६३ साली पुरस्कार प्राप्त. महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*