विख्यात शिल्पकार व अजिंठा लेण्यांचा इतिहास शब्दबध्द करणारे लेखक राम अनंत थत्ते यांचा जन्म २७ जानेवारी १९३४ सालचा. राम थत्ते यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून “जी.डी.आर्ट”ची पदवी संपादन केली होती. थत्ते यांनी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात सातत्याने सहा वर्षे पारितोषिके मिळविली.तसंच, मुंबई राज्यकला प्रदर्शनाचे सहा वेळा परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. महाराष्ट्र कला संचालनालयातर्फे पुतळा समितीवर त्यांची निरीक्षक म्हणून निवड झाली होती. विविध संस्था, चित्रकला महाविद्यालयांमध्ये अधिव्याख्याता म्हणून देखील थत्ते कार्यरत होते. कलाविषयावर विपूल प्रमाणावर लेखन करण्याचं काम राम थत्ते यांनी केले असून त्यांच्या “अजंठा”या २००४ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाला वाचकांसह समीक्षकांकडून कौतुकाची दाद मिळाली होती.
आयुष्याच्या उत्तरार्धात पोटाच्या विकारामुळे राम थत्ते त्रस्त होते. मृत्यूच्या आठ दिवस आधी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; पण उपचार सुरू असतानाच २९ सप्टेंबर २०१४ या दिवशी राम थत्ते यांचे वयाच्या ८०व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
Leave a Reply