(जन्म : २५ डिसेंबर १९५९)
रामदास आठवले हे भारताच्या केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्रीपद भूषवित आहेत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत.
रामदास बंडू आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.
रामदास आठवले यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण ढालेवाडीत (तासगाव, जि. सांगली) झाल्यानंतर पुढे काकांकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी गेले. १९७२ मध्ये दलित पँथर्सची स्थापना झाली आणि ते पँथर्समध्ये सक्रिय झाले. त्यांच्यासोबत अनेक मंडळी बरोबर होती.
रामदास आठवले हे १४ व्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.
Leave a Reply