ठाण्याचं निसर्गसौंदर्य, तलावांचा सुंदर परिसर यामुळे ठाण्याचं वातावरण खरोखरचं अल्हाददायक वाटतं. मग अशा वातावरणात खेळाडू निर्माण न होतील तरच नवल. अशा खेळाडूंना स्फूरण देणारं आणि अॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारातलं ज्येष्ठ नाव म्हणजे रमेश गणेश खारकर हे होय !
१९५६ पासून अॅथलेटिक्स क्रिडा प्रकारात कार्यरत झालेले श्री. रमेश गणेश खारकर हे आज भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे सांख्यिक विभागाचे आयोजक आहेत. १९८१ पासून जागतिक अॅथलेटिक्स सांख्यिक संघटनेचे सदस्य असणार्या खारकर यांनी १९८९ पासून आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स फेडरेशनच्या तज्ञांमध्ये स्थान प्राप्त केले आहे.
त्यांना आजवर ठाणे भूषण, क्रीडाचार्य या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारचे स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, पोलीस स्टेडिअम कोऑर्डीनेटर म्हणूनही त्यांनी कार्यभाग सांभाळला आहे.
Leave a Reply