“डबिंग”, “व्हॉईस ओव्हर”, “अॅंकरींग”, या क्षेत्रातलं अग्रगण्य व्यक्तीत्व म्हणजे रत्नाकर तारदाळकर “आवाज” क्षेत्राकडे किंवा या माध्यमाकडे आकृष्ट होण्यापूर्वी ते एका खासगी कंपनीमध्ये “पी.आर.ओ.” या पदावर कार्यरत होते. त्यानंतर आकाशवाणी, दूरदर्शन माध्यमात “वृत्तनिवेदक” आणि “व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट” म्हणून काम केलं आहे, अनेक लघुपटांसाठी लेखन व निर्मिती रत्नाकर तारदाळकरांनी केली आहे. “झी गौरव पुरस्कार” साठीचा व्ही.ओ. असेल किंवा अनेक कार्यक्रमासाठी वापरण्यात आलेला अनोखा आवाज हा रत्नाकर तारदाळकरांचा आत्तापर्यंत १५०० पेक्षा अधिक जाहिरातीचं डबिंग ही रत्नाकर तारदाळकरांनी केलं आहे. रत्नाकर तारदाळकरांचं बालपण, शिक्षण हे मुंबईतील विलेपार्ले येथे व्यतीत झालं असून, सध्या ही ते श्राव्य, दृकश्राव्य माध्यमांमध्ये अनेक कार्यक्रमामध्ये व्यस्त असतात.
Leave a Reply