रीमा लागू ह्या मराठी व हिंदी चित्रपटात झळकणाऱ्या ख्यातनाम अभिनेत्री आहेत. मूळ नाव नयन भडभडे. त्यांचा जन्म २१ जून १९५८ रोजी झाला. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली.
७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव रीमा लागू झाले.
रीमा लागू यांचे १९ मे २०१७ रोजी निधन झाले.
रीमा लागू यांनी भूमिका केलेली नाटके
घर तिघांचं हवं
चल आटप लवकर
झाले मोकळे आकाश
तो एक क्षण
पुरुष
बुलंद
सविता दामोदर परांजपे
विठो रखुमाय
Leave a Reply