प्रख्यात दूरदर्शन निर्मात्या डॉ.किरण चित्रे यांचा जन्म ९ जूनला झाला. डॉ.किरण चित्रे यांना प्रसारण क्षेत्रांत खूप जण मानतात. किरण चित्रे या निर्मिती सहाय्यक ते सहाय्यक संचालक एवढ्या पदापर्यंत विविध स्तरांवर दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर गेली ३३ वर्ष कार्यरत होत्या.
१९७२ साली डॉ.किरण चित्रे यांना दूरदर्शनला निवेदिका म्हणून नोकरी मिळाली. काही काळानंतर त्या निर्मिती विभागात काम करू लागल्या. पण त्या कायम स्वरूपी नसल्याने त्यांना दूरदर्शन मधून ब्रेक मिळाला, त्यामुळे त्यांनी एअर इंडियात नोकरी करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात दूरदर्शनवर शालेय चित्रवाणीची सुरुवात झाली होती. तेथील मुख्य होते अन्डीअप्पन. त्यांनी किरण चित्रे यांना बोलवून घेऊन त्यांना दूरदर्शनवर शालेय चित्रवाणी साठी काम करण्यास सांगितले.
काही काळ या विभागात काम केल्यावर त्यांनी स्वतंत्र पणे दूरदर्शनसाठी निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला “मुलखावेगळी माणसे” हा कार्यक्रम होता. पुढे दूरदर्शन साठी त्यांनी खूप वर्षे ‘शब्दांच्या पलीकडले’, ‘मुखवटे आणि चेहरे’, अशा दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती केली. अनेक साहित्य संमेलनांचे व नाट्य संमेलनांचे कव्हरेज केले. गाण्यापासून ते अभिनेते अभिनेत्रींच्या मुलाखती पर्यंत आणि सप्रेम नमस्कार पासून अनुबोध पटा निर्मीती पर्यंत असंख्य कार्यक्रम सादर केले आहेत.
डॉ.किरण चित्रे यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply