‘सुरभि’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमाने घराघरांत पोचलेले रेणुका शहाणे हे नाव घराघरात पोचले. त्यांचा जन्म २७ मार्च १९६५ रोजी झाला.त्यांचे ते दिलखुलास हसून ‘नमस्कार’ म्हणणे आजही लोकांच्या कानांत आणि डोळ्यांसमोर आहे.
मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये आर्ट्स या विषयात पदवी प्राप्त केलेल्या रेणुका शहाणे यांनी १९९२ मध्ये ‘हाच सुनबाईचा भाऊ’ या मराठी सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरवात केली. मात्र त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती १९९३ ते २००१ या काळात दुरदर्शनवर प्रसारित झालेल्या ‘सुरभी’ या कार्यक्रमाने. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांच्या सुत्रसंचलनाने बहरलेला हा कार्यक्रम खूप यशस्वी ठरला होता. त्यानंतर १९९४ मध्ये आलेल्या ‘हम आपके है कौन’ या सिनेमातील भूमिकेने रेणुकाच्या लोकप्रियतेत वाढ केली.
१९९४ सालचा ‘हम आपके है कोन’ आजही झी सिनेमा वाहिनीवर सातत्याने दाखवला जात असून, तो आवर्जून पाहिला जातो. जोपर्यंत आपल्या देशात लग्नसंस्कृती कायम आहे, तोपर्यंत या चित्रपटाबाबतचे आकर्षण असेच कायम राहणार आहे.
आपली आई आणि प्रसिद्ध लेखिका शांता गोखले यांच्या कादंबरीवर आधारित ‘रिटा’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून रेणुका शहाणे यांच्यातील दिग्दर्शिकेशी ओळख झाली. रेणुका शहाणे यांनी अभिनेता आशुतोष राणा यांच्यासोबत लग्न केले आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Leave a Reply