मराठी कथक नर्तकी रोहिणी भाटे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९२४ रोजी झाला.
ज्या काळात भारतात पांढरपेशा घरातील मुलींनी स्टेजवर नृत्य करणे ही प्रथा समाजमान्य नव्हती, त्या काळात एका मराठी मुलीने नृत्य करणे ही गोष्ट धारिष्ट्याचीच होती. पण एकदा घेतलेला निर्णय रोहिणी भाटे यांनी मरेपर्त्णत निभावला. त्या बुद्धिमान तर होत्याच शिवाय त्या कविताही करीत. गाण्याचेही त्यांना अंग होते. या सर्वांचा उपयोग त्यांना नृत्यसाधनेसाठी झाला.
रोहिणी भाटे यांनी लखनौ घराण्याचे कथक नर्तक लच्छूमहाराज व जयपूर घराण्याचे नर्तक मोहनराव कल्याणपूरकर यांच्याकडे कथक नृत्याचे शिक्षण घेतले होते.
रोहिणी भाटे यांनी आपल्या आयुष्याची तब्बल ६५ वर्षे नृत्यक्षेत्रात मोठे योगदान दिले. महाराष्ट्र राज्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांच्या रोहिणीताई मानकरी ठरल्या. संगीत नाटक अकादमी पारितोषिक, नृत्य-विलास, नृत्य-गंध, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, गोदावरी गौरव पुरस्कार, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाची फेलोशिप, प्राईड ऑफ पुणे. आदी सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले.
रोहिणी भाटे यांनी लिहिलेले लहेजा या नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. पुणे महापालिकेने रोहिणी भाटे यांच्या नावाने ’स्वर्गीय गुरू पंडिता रोहिणी भाटे पुरस्कार’ देण्यात सुरवात केली आहे.
रोहिणी भाटे यांचे १० ऑक्टोबर २००८ रोजी निधन झाले.
Leave a Reply