जन्म : चैत्र शु. नवमी (रामनवमी) शके १५३० (सन १६०८), ग्राम जांब (मराठवाड्यातील वर्तमान जालना जिल्हा)
प्रारम्भीच्या काळात नाशिकजवळ पंचवटी व टाकळी तेथे १२ वर्षे तपश्चर्या. करुणाष्टके, मनाचे श्लोक आदि रचना याच काळातील. तदनंतर १२ वर्षांचा काळ परिव्रजन करत भारतभर तीर्थाटन.
महाराष्ट्रात ११ स्थानी श्रीमारुतीरायाच्या मूर्तींची स्थापना. मठस्थापना व विशाल शिष्यपरिकर. तत्पश्चात शिवथरघळीत राहून ७७५१ ओव्यांच्या बृहदाकार “दासबोध” ग्रंथाचे लेखन.
जनसामान्यांना रामभक्तिची शिकवण.
छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती संभाजीराजांशी प्रत्यक्ष संपर्क व प्रसंगानुसार त्यांना मार्गदर्शन केल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत.
सन १६८१ मध्ये माघी नवमीला महाप्रयाण.
Leave a Reply