नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून सामाजिक कार्यात झोकून देणारं ठाण्यातील एक व्यक्तीमत्व म्हणजे श्रीमती संपदा वागळे.
बी.एस्.सी. पर्यंत शिक्षण घेतलेल्या संपदाजींनी स्टेट बॅंकेत २६ वर्षे नेटाने काम केले व त्याकरिता त्या अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. एव्हढेच नव्हे तर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यातही त्यांन अनेक पुरस्कार प्राप्त झाले. ग्राहक सेवा व डिपॉझिटस् आणल्याबद्दल ढाल, पर्यावरण मंचाकडून वसुंधरा पुरस्कार तसेच २०११ च्या म.टा. सन्मान पुरस्कारासाठी जज म्हणून निवडही झाली.
व्ही.आर.एस. नंतर लेखनास सुरवात करणार्या संपदाजींनी आपली मैत्रिण विठ्ठला ठुसे हिच्यासमवेत आचार्य अत्रे कट्ट्याची स्थापना केली. आज कट्ट्याचे ५२५ च्या वर कार्यक्रम झाले आहे.
एव्हढेच नव्हे तर त्यांनी एकपात्री कार्यक्रम सादर केले.
महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता आणि सकाळ यांसारख्या दैनिकातून त्यांचे सुमारे २४० लेख प्रसिद्ध झाले.
याबरोबरच त्यांनी सर्वसामान्यांसाठी ठाण्यात मुक्त व्यासपीठ निर्माण केले. या व्यासपीठाने अनेकांना आयुष्यात पुन्हा उभं राहण्यासाठी हात दिला, तसेच सर्वसामान्यातून अनेक वक्ते घडले. आज या व्यासपीठावर कार्यक्रम करण्याची संधी मिळणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. त्याचप्रमाणे त्यांनी राजीव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी गंमत शाळा चालवली.
## Sampada Wagle
Leave a Reply