पत्रकारिता आणि संज्ञापन क्षेत्रात पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या संदीप माळवी यांनी दै. तरुण भारत, महाराष्ट्र हेरॉल्ड, इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रांमध्ये १२ वर्षं पत्रकार म्हणून काम केलं आहे. त्यानंतर सन २००२ मध्ये त्यांनी सरकारी नोकरीत प्रवेश केला. एका बाजूला पत्रकारिता आणि त्यानंतर सरकारी नोकरी तर दुसर्या बाजूला त्यांनी लेखक म्हणूनही लौकिक मिळवला.
गेली १५ वर्षं सातत्यानं विविध नियतकालिकं, वृत्तपत्रांमधून माळवी यांनी कथा, कविता आणि लेखमाला लिहीत आहेत. गझल सागर प्रकाशित ऋतूवेदनांचे हा त्यांचा गझल संग्रह मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे. त्याचप्रमाणे माय अर्थात आईच्या कविता या संपादित काव्यसंग्रहात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरही त्यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत.
त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीत त्यांना उत्कृष्ट पत्रकारिता (१९९६), “ऋतूवेदनांचे” या गझल संग्रहाला २००९ चा महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार, पी. सावळाराम पुरस्कार २००९, विठ्ठल उमप पुरस्कार एकता कल्चरल अकादमी २०१० अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.
संदर्भ : माझे ठाणे
Leave a Reply