संत नरहरी सोनार

Sant Narhari Sonar

नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम शैवपंथी होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करुन टाकला. रामचंद्रदास कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्यूत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती.

नरहरी सोनाराच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. ‘सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई’ ‘शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा’ माझे प्रेम तुझे पायी’ आणि देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार’ अभंग प्रसिद्ध आहेत

1 Comment on संत नरहरी सोनार

Leave a Reply

Your email address will not be published.


*