सांगवेकर, सौरभ रामदास

Sangavekar, Saurabh Ramdas

जलतरण क्रीडाप्रकारात ठाण्याचे नाव मोठं करण्यात वाटा असलेला सौरभ सांगवेकर हा जलतरणपटू म्हणजे अनवाटांनी जाऊनही आपल्या आयुष्याचं ध्येय गाठणारा ध्येयवादी आहे. कळवा येथील यशवंत रामा साळवी तरणतलावातून त्याने आपल्या जलतरण कारकीर्दीस प्रारंभ केला. शिवछत्रपती क्रीडासंकुल बालेवाडी, पुणे येथे व नंतर बसवनगुडी ऑक्वाटीक सेंटर, बंगळूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रातून त्याने प्रशिक्षण घेतले.

भारतातील सर्वोत्कृष्ट जलतरणपटू आणि राष्ट्रीय विक्रम करणारा पहिला ठाणेकर जलतरणपटू; तसंच आंतरराष्ट्रीय पदक मिळवणारा पहिला ठाणेकर जलतरणपटू; पहिल्या दक्षिण आशियाई जलतरण स्पर्धेत २०० मी. फ्री स्टाईल सुवर्णपदक सौरभनं पटकावलं. सौरभनं आजपर्यंत १९ सुवर्णपदक, १२ रौप्यपदक आणि ७ ब्रॉंझ पदक अशी एकूण ३८ पदकं कमावली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*