ज्येष्ठ व्हायोलिन वादक पं.डी.के.दातार यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३२ रोजी झाला. पं. डी.के.दातार यांची व्हायोलिनची वादनशैली गायकी अंगाची म्हणजे गायनाशी नातं आणि इमान राखणारी आहे.
१९४३ मध्ये ते देवधर मास्तरांच्या ‘स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ मध्ये दाखल झाले. तिथे पंडित विघ्नेश्वरशास्त्री यांच्यासारखे व्हायोलिनवर कमालीचं प्रभुत्व असलेले गुरू त्यांना लाभले. विघ्नेश्वरशास्त्रींनी आपली सारी कला या प्रज्ञावंत शिष्याच्या झोळीत टाकली. मात्र पं. दातार यांनीही मिळालेले दान अंधपणाने स्वीकारले नाही. आपल्या प्रतिभेने त्यांनी ते अधिक झळझळीत केले.
पं. डी. के. दातार यांच्या आधी १०० वर्षांची व्हायोलिन वादनाची परंपरा असलेल्या कर्नाटक संगीतात गायकी अंगाने व्हायोलिन वाजवण्याची पद्धत होती. परंतु हिंदुस्थानी संगीतात ती रुजली नव्हती. ती रुजवण्याचे मोठे काम पं. दातार यांनी केले. पं. दातार यांना पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमीचा सन्मानही मिळाला आहे. संगीत रिसर्च अकादमी आणि कुमार गंधर्व फाऊण्डेशन यांनीही पं. दातार यांचा गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply