मुद्रण तंत्रज्ञानात मौलिक संशोधन करणारे अमेरिकानिवासी भारतीय संशोधक. भिसे टाइप मुद्रण यंत्र, सिंगल टाइपकास्टर विथ युनिव्हर्सल मोल्ड, रोटरी मल्टिपल टाइपकास्टर या यंत्रांचा, अॅटोमायडीन या औषधाचा व विद्युत्शास्त्र वगैरेतील एकूण २०० शोधांचे जनक. त्यांना ४० शोधांची एकस्वे मिळाली.
शंकर आबाजी भिसे यांचा जन्म १८६७ मध्ये झाला. ज्या भारतामध्ये, म्हणजेच भारतामधल्या ज्या विशिष्ट काळामध्ये त्यांनी स्व कर्तुत्वावर व स्व हुषारीवर विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आभाळात यशस्वी गरूड भरारी मारली, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. जगातल्या तमाम लोकांना व अगदी विख्यात शास्त्रज्ञांनाही पेचात पाडणार्या समस्यांवर, तसेच चालु तंत्रज्ञानांमधील त्रुटी अथवा दोषांवर झपाटल्यागत काम करून सर्वसामान्यांचे व विशेषतः लेखकांचे जीवन गतिमान व सुसह्य करणारा तंत्रज्ञ, अशी त्यांची जनमानसात प्रतिमा आहे.
छपाईतंत्राचा शोध चीनमध्ये चार शतकांपुर्वी लागला असला तरी छपाईसाठी लागणार्या अक्षरांचे खिळे पाडणारी आणि त्यांची जुळणी करणारी यंत्रं दीडशे वर्षांपुर्वीपर्यंतही फारच संथगतीने काम करीत असत. एका मिनीटाला फक्त दीडशे अक्षरांची जुळणी व्हायची. जगामधील अनेक वैज्ञानिक व संशोधन क्षेत्रांमध्ये नाव कमावलेल्या संस्थांनी या यंत्राच्या आधुनिकीकरणासाठी जातीने प्रयत्न केले पण मनाजोगते यश कुणालाही मिळत नव्हते. शेवटी मराठमोळ्या अशा शंकर भिसे यांनी आपले सारे लक्ष, शक्ती व जगावेगळी घडण असलेले त्यांचे तल्लख व चपळ डोके या संशोधनकार्यासाठी पणाला लावले. काही वर्षांतच त्यांनी मिनीटाला बाराशे अक्षरांची जुळणी सहजगत्या करू शकणार छपाईयंत्र बनवण्याची किमया केली. हे यंत्र गतिमानतेबरोबरच गुणवत्ता व अचुकता यांचा सुवर्णमध्य गाठणारं असल्यामुळेच त्याची दखल परदेशातही घेतली गेली.
१९३५ साली शंकर भिसे यांचे निधन झाले .
{ माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोश }
Leave a Reply