चित्रकलेच्या क्षेत्रात ठाण्याचे नाव उज्वल करणारे प्रसिद्ध चित्रकार व नामवंत संस्थांच्या बोधचिन्हांचे निर्माते श्री. शांताराम काशिनाथ राऊत.
राऊत यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात FCBULKA या जाहिरात कंपनीमध्ये विभाग प्रमुख व कलासल्लागार म्हणून काम केले. ठाणे आर्ट सोसायटीमध्ये प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. सारस्वत बॅंक, यशवंतराव मुक्त विद्यापीठ, ठाणे श्रमजीवी संघटना, ठाणे आर्ट सोसायटी इत्यादी अनेक नामवंत संस्थांच्या बोधचिन्हांची त्यांनी निर्मिती केली.
ठाण्यातील कलावंतांना व चित्रकारांना एकत्र आणण्यासाठी दर्शन या चॅरीटेबल ट्रस्टची स्थापना त्यांनी केली. ठाणे आर्ट स्कूलच्या निर्मितीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. ठाण्यातील नीताई – गौरज आर्ट गॅलरी मध्ये चित्रकला विषयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात्मक कला प्रदर्शनाचे आयोजन राऊत यांनी केले. कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल त्यांना ठाणे नवरत्न पुरस्कार २०१०, वीर सावरकर पुरस्कार २००९, अनुक्रमे ४ वेळा युनायटेड नेशनकडून पुरस्कार व अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
<!– – चित्रकार
पत्ता : १०१, हार्मनी, हरी ओम नगर, रो हाऊस नं १ च्या समोर, कोपरी, ठाणे (पू)
कार्यक्षेत्र : चित्रकार, छायाचित्रकार, कवी
दूरध्वनी : २५३२००५४ – भ्रमणध्वनी : ९८१९९७५२७७
ई-मेल : shantaram.swastik.raut3@gmail.com
–>
Leave a Reply