![10743](https://www.marathisrushti.com/profiles/wp-content/uploads/sites/2/2014/11/10743.jpeg)
२० नोव्हेंबर १९६९ रोजी मुंबईत कला संपन्न घरात जन्मलेल्या शिल्पा शिरोडकरने आपल्या कारकीर्दीची सुरुवात बॉलिवूडच्या चित्रपटापासून; ’भ्रष्टाचार’ हा शिल्पा शिरोडकर यांचा पहिला हिंदी सिनेमा. यामध्ये तिने अंध मुलीची भूमिका साकारली होती.
शिल्पा शिरोडकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ’किशन कन्हैय्या’ या सिनेमामुळे. त्यानंतर ‘त्रिनेत्र’ , ‘हम’, ‘दिलही तो है’, ‘आँखे’, ‘खुदा गवाह’, ‘पहचान’, ‘गोपी किशन’, ‘मृत्यूदंड’ या सिनेमांमध्ये काम केले. हे सर्व चित्रपट लोकप्रिय ठरले .लग्नापूर्वीचा शिल्पाजींचा शेवटचा सिनेमा ’गज गामिनी’ हा होता. बॉलिवूडमध्ये शिल्पाला शिरोडकर यांची बोल्ड अभिनेत्री म्हणून ख्याती होती. यूकेत स्थायिक व व्यवसायाने बँकर असणार्या अप्रेशरंजीत या व्यक्ती सोबत ११ जुलै २००० यादिवशी मुंबईत विवाहबध्द झाली .लग्नानंतर शिल्पा यूकेत स्थायिक झाली. २००३ मध्ये शिल्पाने मुलीला जन्म दिला. तिचे नाव अनुष्का असून शिल्पा तिच्या संगोपनात बिझी झाली. शिल्पाने ‘सौभाग्यवती सरपंच’ या मराठी चित्रपटातून भूमिका साकारत आपली आजी मीनाक्षी शिरोडकर यांची मराठीची परंपरा देखील जपली व ‘ऑरेंज ट्री प्रॉडक्शन’ अशी निर्मिती संस्था स्थापन करून ती परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. यूकेतून भारतात परतल्यानंतर शिल्पा शिरोडकरांनी ’एक मुठ्ठी आसमान’ या दूरचित्रवाणी मालिकेतनं कमबॅक काम करत या मालिकेत त्यांनी मोलकरणीची भूमिका साकारली आहे.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (20-Nov-2018)
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (20-Nov-2018)
Leave a Reply