पुरस्कार : त्यांना आजवर म.टा. सन्मान २००२, राष्ट्रीय रत्न पुरस्कार २००४, पी सावळाराम पुरस्कार २००६ असे अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
“पवित्र रिश्ता”, “बडे अच्छे लगते है”, सहित सहा हिंदी आणि अठरा मराठी मालिकांचे लेखन करणारे गिरीष लाटकर हे ठाण्यातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व. ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूल आणि त्यानंतर बेडेकर महाविद्यालयातून लाटकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असतानाच एकांकिका स्पर्धांतून अभिनेता म्हणून त्यांनी कला क्षेत्रात पदार्पण केले. तिथून त्यांच्या लेखनाची सुरुवात झाली. त्यानंतर लाटकरांनी मागे वळून पाहिलेच नाही. “अनधिकृत”, बुढ्ढा होगा तेरा बाप”, ही नाटकं, “गोजिरी”, “आधांतरी”, “भिती”, इ. चित्रपट आणि हिंदी, मराठी मिळून २४ मालिकांचे लेखन करण्याचा मान लाटकरांना जातो.
मनातील ठाणे :
ठाण्याची एकंदरीत सांस्कृतिक जडण घडण बघता सुसंस्कृत वातावरण हेच लेखनाचा केंद्रबिंदू असल्याचं लाटकर सांगतात. त्यामुळे त्यांना इथल्या वातावरणाबद्दल कमालीची ओढ वाटते. जन्मापासून ठाण्यात वास्तव्याला असणार्या लाटकरांना ठाण्यात झालेल्या असामान्य प्रगतीचा साक्षीदार असल्याचा अभिमान वाटतो. भविष्यात ठाण्याची सर्वांगीण उन्नती होऊन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडण घडणीत ठाण्याचा मोठा वाटा असेल. जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल अशी ठाण्याची बांधणी असेल. असं त्यांना वाटते.
Leave a Reply