पाटील-निलंगेकर, शिवाजीराव

राजकारणाचा व मंत्रीपदाचा दीर्घ अनुभव असलेल्या शिवाजीराव पाटील – निलंगेकर यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द अल्प असली तरी राज्याला विकासाच्या दिशेने नेणारी होती.

त्यांच्याच कारकिर्दीत मराठवाडा विकासासाठी ४२ कलमी, विदर्भ, विकासासाठी ३३ कलमी तर कोकण विकासासाठी ४० कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला.

रोजगार हमीमधील मजुरांना मजुरीशिवाय रोज अर्धा किलो ज्वारी देण्याची एक चांगली योजना निलंगेकर यांनी राबवली. स्वातंत्र्य सैनिकांच्या मानधनात वाढ, शेतकर्‍यांनी बॅंकेकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजात सूट, मागासवर्गीय वस्त्यांमध्ये विद्युतीकरण करण्याचा निर्णय, औद्योगिक विकास महामंडळात वसाहती तालुक्याच्या ठिकाणी सुरु करण्याचा निर्णय इ. महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले.

याशिवाय खेड्यांमध्ये दूरदर्शन संच देण्याचा निर्णय, लोकन्यायालय स्थापण्याचा निर्णय, शासकीय कर्मचार्‍यांच्या गार्‍हाणी ऐकण्यासाठी व न्याय देण्यासाठी प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापण्याची घोषणा इ. निर्णयदेखील त्यांच्यातील कुशल प्रशासक व लोकाभिमुख नेतृत्वाची झलक दाखवून देतात.

## Shivajirao Patil-Nilangekar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*