निबंधकार, पत्रकार, साहित्यिक-समीक्षक, फर्डे वक्ते शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म २७ जून १८०४ रोजी झाला.
“काळ” साप्ताहिकाचे संस्थापक, वा “काळ-कर्ते” ही त्यांची ओळख. “एका खडी फोडणार्याची गोष्ट”, “आम्रवृक्ष”, “एक कारखाना” आदी कथा, “गोविंदाची गोष्ट”, “विंध्यांचल” या कादंबर्या, “पहिला पांडव” “मानाजीराव”, आदी ९ नाटके, “अहिल्याजारकाव्य”, “तर्कसंग्रहदीपिका”, “मराठ्यांच्या लढायांचा इतिहास”, आदी सुमारे २० संकीर्ण पुस्तके आणि “काळ” मधील निवडक निबंध ही त्यांची ग्रंथसंपदा.
किर्लोस्करांच्या “सं.सौभद्र” नाटकाचे त्यांनी संस्कृत भाषांतर केले होते.
शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य या नावाचे साप्ताहिक सुरु केले.
Leave a Reply