शोभना समर्थ

Samartha, Shobhana

Shobhna Samarth

शोभना समर्थ यांचे वडील बँकचे संचालक होते. हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या नूतन व तनुजा यांची मातोश्री व काजोल, मोहनीश बहेलची आजी. त्यांचा जन्म १७ डिसेंबर १९१६ रोजी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर मामा जयवंत (मा.नलिनी जयवंतचे वडील) यांच्याकडे त्यांचे संगोपन झाले.

जर्मनीहून सिनेमेटोग्राफीचे प्रशिक्षण घेऊन आलेले कुमार सेन समर्थ यांच्यासोबत त्याचा विवाह झाला. सरोज शिलोत्रीची ‘शोभना समर्थ’ झाल्या. त्या काळातील मातब्बर कलाकार मोतीलाल बरोबर सौंदर्य खणी शोभना समर्थ यांची जोडी खूप गाजली.

‘साधना’ (१९३९), ‘सौभाग्य’ (१९४०), ‘भरतमिलाप’, ‘स्वामीनाथ’ (१९४२), ‘रामराज्य’ (१९४३), ‘उर्वशी’ (१९४६), ‘विधरांगणा’ (१९४७), ‘रामबाण’ (१९४८), ‘रामविवाह’ (१९४९), ‘रामायण’ (१९५४). राम-सीतेच्या भूमिकेतील ही जोडी भारतभर पसंतीस उतरली.

१९४९मध्ये शोभना पिक्चर्स नामे स्वतःची निर्मिती करून ‘हमारी बेटी’ चित्रपट काढला. यात तिने आपली ज्येष्ठ कन्या नूतनला नायिकेचा रोल दिला. त्यांनी १९६० साली ‘छबीली’ चित्रपटाद्वारे दुसरी कन्या तनुजाला चित्रपटात आणले. शोभना समर्थ यांचे निधन ९ फेब्रुवारी २००० रोजी झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*