घुले, श्रद्धा भास्कर

<!–
– क्रीडापटू – अॅथलेटिक्स
पत्ता : बी – २०३, हार्मनी, सिद्धेश्वर गार्डन, ढोकाळी नाका, कोलशेत रोड, ठाणे
कार्यक्षेत्र : क्रीडा
भ्रमणध्वनी : ९८७०७९८६९९
–>

क्रीडा किंवा खेळ असं म्हटल्यानंतर आपल्यासमोर क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, टेनिस इत्यादी नाव आपल्यासमोर येतात; परंतु या सर्व खेळांच्या मुळाशी असलेला क्रीडा प्रकार ज्याला आपल्या देशात फारशी प्रसिद्धी मिळत नाही असा क्रीडा प्रकार म्हणजे “अॅथलेटिक्स”. जागतिक स्तरावर प्रचंड महत्व आणि प्रसिद्धी असणार्‍या या क्रीडाप्रकारात अतिशय लहान वयात नैपुण्य मिळवून, आपल्या ठाणे शहराचं नाव जिनं जागतिक पटावर सन्मानानं कोरलं ती “श्रद्धा घुले” म्हणजे ठाण्याचं भूषणच!

प्रशिक्षक निलेश पाटकर यांच्याकडून अॅथलेटिक्सचे प्रशिक्षण घेणार्‍या श्रद्धाने २००४ ते २०१० पर्यंत जिल्ह्यातील कुमारी अॅथलिट म्हणून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकांची लयलूट केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून देणारी ती ठाण्यातील पहिलीच मुलगी आहे. एवढंच नव्हे तर “युवा राष्ट्रकुल स्पर्धेत” ट्रिपल जंप या प्रकारात नवा जागतिक विक्रम नोंदवून सुवर्ण पदक पटकावणारी ठाण्यातली ती पहिली महिला अॅथलिट आहे. त्याचबरोबर “अशियाई कनिष्ठ अॅथलेटिक्स” स्पर्धेत श्रद्धानं कांस्य पदकाची कमाई केली. आजवरच्या कारकीर्दीत श्रद्धानं २ आंतरराष्ट्रीय, ४२ राष्ट्रीय तर ३४ राज्यस्तरीय अशा एकूण ७८ पदकांची लयलूट करुन ठाणे शहराचं नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णाक्षरांनी कोरलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*