मुंबई विद्यापीठातून बी.फार्म, एल.एल.बी. पदव्या मिळवलेले श्रीकांत वाड यांनी अतिशय विरोधाभासी क्षेत्रात आपलं नाव मिळवून ठाण्याला मोठं केलं आहे. एका बाजूला बी.फार्म आणि एल.एल.बी. तर दुसरीकडे बॅडमिंटन या दोन टोकांच्या क्षेत्रात श्रीकांत वाड यांनी आपली छाप सोडली आहे.
सुरुवातीला खेळाडू म्हणून बॅडमिंटन क्षेत्रात पदार्पण करुन नंतर प्रशिक्षक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला, सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमी या संस्थेतून त्यांचे २३ खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत. नव्या खेळाडूंना संधी देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. २००३-२००४ त्यांनी भारतीय संघासाठी प्रशिक्षक म्हणून कार्य केले.
त्यांना आजवर दादोजी कोंडदेव पुरस्कार, ठाणे मानबिंदू, नगररत्न, ठाणे गौरव, रत्न सौरभ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
Leave a Reply