ठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. १९५३ पासून ठाण्यात वास्तव्य. १९५४ साली मासुंदा तलाव श्रमदानाने स्वच्छ करण्यात आला त्यात नेर्लेकरांचा सहभाग होता. ते ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य आहेत.
त्यांनी प्रतिभा दिवाळी अंकाचे गेले सहा वर्षे संपादन केले. अनादि अनंत सावरकर हे २१ लेखकांचा सहभाग असलेल्या पुस्तकाचे यशस्वी संपादन. पुस्तकाच्या १० आवृत्या निघाल्या. विद्यार्थ्यांसाठी धगधगते यज्ञकुंड वि.दा.सावरकर हे स्वतंत्र पुस्तक लिहिले. त्याला भरघोस प्रतिसाद. व्यास क्रिएशन्स संस्थेचे ते मार्गदर्शक आहेत.
६१ व्या मराठी साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग होता. २०१० मध्ये ठाण्यात भरलेल्या ८४ व्या अ.भा.साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शन स्टॉलचा प्रमुख म्हणून काम केले. जांभळी नाक्यावरील चौकातील गायब करण्यात आलेला रंगोबापूजी गुप्ते चौकाचा फलक वृत्तपत्रातून लिखाण करुन पुन्हा बसवून घेतला. वृत्तपत्रातून अन्यायाविरुद्ध लिखाण केल्याने अनेकांचा अन्याय दूर झाला.
विधायक व सेवाभावी पत्रकारिता केल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा कै. शि. म. परांजपे स्मृती पुरस्कार मिळाला. पंच्याहत्तरी निमित्त प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय सत्कार झाला.
## Nerlekar, Shreekant Waman
Leave a Reply