मराठी नाटककार, विनोदकार व वाड्गमयसमीक्षक. एल्.एल्. बी. पर्यंतचे शिक्षण. व्यवसाय वकिलीचा. त्यांचा जन्म २९ जून १८७१ रोजी झाला. त्यांनी आपल्या वाड्गमयसेवेचा आरंभ संगीत विक्रमशशिकला नाटकावरील टीका लेखाने (1893) केला. संगीत वीरतनय (1896) हे त्यांचे पहिले नाटक .
त्यानंतर त्यांनी मूकनायक (आवृ. दुसरी, 1922, प्रथम प्रयोग 1901), गुप्तमंजु (1903), मतिविकार (1907), पेमशोधन (1911), वधूपरीक्षा (1914), सहचारिणी (1918), पावित्र्य (1924), श्रमसाफल्य (1929) आणि मायाविवाह (1946), ही नाटके लिहिली. उपयुक्त बारा नाटकांपैकी पहिली आठच रंगभूमीवर आली. `साक्षीदार` हा त्यांचा पहिला विनोदी लेख विविध ज्ञानविस्तारात प्रसिध्द झाला (1902) . सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे (1910) हो त्यांच्या विनोदी लेखांचा संग्रह.
त्याची तिसरी आवृत्ती सुदाम्याचे पोहे – अर्थात साहित्य बत्तिशी हया नावाने प्रसिध्द झाली (1923) त्यांचे समीक्षालेख, अध्यक्षीय भाषणे, निबंध कोल्हटकरांचा लेखसंग्रह (1932) हया नावाने प्रसिध्द झालेले आहेत. दुटप्पी की दुहेरी (1925) आणि श्यामसुंदर (1925) हया दोन कादंबऱया त्यांनी लिहिल्या. त्यांनी काही लघुकथाही लिहिल्या आहेत. गीतोपायन (1923) हा त्यांचा कवितासंग्रह.
`बहु असोत सुंदर संपन्न` हया सुप्रसिध्द महाराष्ट्रगीताचे ते जनक आहेत. साधारणपणे 1920 पर्यंतच्या त्यांच्या जीवनाचा आढावा त्यांनी आपल्या आत्मवृत्तात (1935) घेतला आहे. भारतीय ज्योतिर्गणित (1913) हया ग्रंथातून त्यांच्या ज्योतिर्गणितविषयक व्यासंगाचा प्रत्यय येतो.
१ जून १९३४ रोजी त्यांचे निधन झाले.
Leave a Reply