निबंधकार व अर्थशास्त्रविषयक नियतकालिकांचे संपादक अशी ओळख असलेल्या श्रीपाद वामन काळे यांचा जन्म ५ मार्च १९१० रोजी झाला. पुढे पाऊल, “तुमचे स्थान कोणते”, “कौटुंबिक हितगुज”, “दाणे आणि खडे”, “नवी घडी नवे जीवन”, “नव्या जीवनाची छानदार घडी”, यांसारख्या अनेक पुस्तकांचे लेखन श्रीपाद काळे यांनी अत्यंत स्वयंस्फुर्तीने केले. समाजाचे सूक्ष्म निरीक्षण, व्यापकरितीने विचार करणे, ओघवती भाषा आणि नाजूक मार्मिक विनोदांची पखरण त्यांच्या लिखाणात दिसून येते.
Leave a Reply