डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांचा जन्म १४ डिसेंबर १९४८ रोजी कानपूर येथे झाला.
संगीताचे मार्गदर्शन त्यांना पं. बोडस, बंधू काशिनाथ, तसेच पं बलवंतराय भट्ट, पं. वसंत ठकार, पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडून मिळाले. पंडित गजाननराव जोशी यांचे त्यांच्या गायनावर संस्कार होते. ख्याल गायिकी आणि भजनगायनासाठी त्या ओळखल्या जात होत्या. संगीताबरोबरच संस्कृत आणि इंग्रजीतील पदवीही कानपूर विद्यापीठातून प्राप्त केली होती. त्यानंतर ‘संगीत अलंकार’ ही पदवी मिळविली होती.
वीणा सहस्रबुद्धे यांना २०१३ मध्ये राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांचे दि. २९ जून २०१६ रोजी निधन झाले.
#Dr.VeenaSahastrabuddhe
Leave a Reply