मराठी बालवाड्.मयात असंख्य लहान मुलांच्या चेहर्यावर हसू उमटेल अश्या असं दर्जेदार बालसाहित्य निर्माण करण्यात महत्वाचं योगदान देणार्या सुमती पायगावकर यांचा जन्म १९१० साली झाला. संस्कारपुर्ण लेखन व निखळ मनोरंजनाची खात्री असलेली त्यांची पुस्तके मराठी कुटुंबियांमध्ये व बच्चेकंपनीमध्ये लाडकी व आवडती ठरली आहेत.
बालसाहित्याची लेखिका म्हणून सुमती यांनी “पतंग“, “शेंडू“, “शिंपला“, “गीतकलिका“, “फेनाली“, “जिमी“, “दर्यासारंग सिंदबाद“, “हिमाली“, “आटपाटनगर“, “स्वप्नरेखा“ , “रानगावची आगगाडी“, “फाटफूट धूम“, “कावळोबाच्या गमती“ अशा ऐकुण ८० पुस्तकांच्या प्रकाशनाद्वारे आपल्या लेखनाची मोहोर यशस्वीपणे उमटविली आहे.
केंद्र शासनाचे १९५८, १९५९, व १९६१ या वर्षाचे बालवाड्.मयासाठीचे पुरस्कार सुमती पायगावकर यांना प्राप्त झाले. त्यांच्या “मिनीची बाहुली“, “पोपटदादाचे लग्न“ या पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. “हॅन अँडरसन“ या पुस्तकामधून त्यांनी १२ भागांमध्ये केलेले परीलेखनदेखील प्रचंड गाजले होते.
१९७७ साली सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या सुमती पायगावकर अध्यक्षा होत्या.
Leave a Reply