डॉ.पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला.
पाश्चात्य संस्कृती, शिष्टाचार, चालीरीती व सभ्यता याचे सूक्ष्म अवलोकन केले. २१ ऑगस्ट १९२० रोजी पंजाबराव एस. मलोत्रा यांच्या बोटीने ७ सप्टेंबर १९२० ला इंग्लंडला पोचले. अत्यंत खडतर जीवन जगत पंजाबरावांनी अभ्यास करून उच्च विद्याविभुषीत होउन डॉ.पंजाबराव १५ जुलै १९२६ रोजी मुंबई गेट वे ऑफ ईंडीयावर उतरले.
अमरावती जिल्ह्याच्या ईतिहासात हि सुवर्ण अक्षराने लिहिणारी घटना होती.
शिक्षणामुळे होणारी दैना,अज्ञांन, निरक्षरता हा शाप समाजाला आहे. हे त्यांनी ओळखून त्यांनी श्री शिवाजी मराठा हायस्कूल काढण्याचा निर्णय घेतला. १जुलै १९२५ हा दिवस अमरावतीचे ऎतिहासात अत्यंत महत्वाचा व सुवर्ण अक्षराने लिहावा असा ठरला. गोपाळराव देशमुखानच्या आवारात एका शेड खाली एक महिन्याच्या आतच सरकार मान्यता मिळाली
साऱ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण देऊन हजारो विद्यार्थी बाहेर पाठविले. हि त्यांची कितीतरी दैदिप्यमान क्रांती होती!
शिक्षणा सोबत विद्यार्थी मजबूत व सुदृढ बनावेत असे त्याना वाटे. या साठी त्यांनी १९२६ साली श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना केली.ते करते समाज सुधारक होते. १४ डिसेंबर १९३० ला नागपूर मंत्रीमंडळात मंत्री म्हणून त्यांची निवड झाली.
विद्यालय, महाविद्यालय, कृषी विद्यालय त्यांनी सुरू करून शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात नेली.
पंजाबराव देशमुख यांचे निधन १० एप्रील १९६५ रोजी झाले.
#DrPanjabraoDeshmukh
Leave a Reply