सोन्या पाटील यांचे नाव आज तळागाळातील लोकांच्या तोंडावर चांगलेच रुळलेले दिसते, कारण आदिवासी वस्त्यांमध्ये काम करून तिथल्या जनतेची होईल ती सेवा करण्याचा व या जनतेचे राहणीमान उंचावण्याचा शिरस्ता गेली कित्येक वर्षे जोपासला आहे.
सोन्या पाटील यांचा जन्म वेहेळे गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबामध्ये झाला. आज राजकारणामध्ये ते सक्रिय असले तरी पहिल्यापासून त्यांचा खरा ओढा हा समाजकारणाकडे होता. “समाज कल्याण न्यास” या भारत सरकारच्या उपक्रमामुळे एकत्रित आलेल्या संघटनेने त्यांच्या आयुष्याला खर्या अर्थाने वळण दिले. या संघटनेच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःला पुर्णपणे समाजसेवेमध्ये झोकून दिले. बालकामगारांसाठी त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या असून हजारो विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. कापड उद्योगात सर्वाधिक बाल कामगार असतात हे ताडून, त्यांना शिक्षण उपलब्ध करुन पुढे स्वावलंबी बनविण्याचा प्रभावी प्रयत्न सोन्या पाटीलांनी केला.
“समाज कल्याण न्यास संस्थे”च्या विद्यमाने त्यांनी तत्काळकालीन व मोफत रूग्णवाहिका सेवादेखील सुरू केली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, वाडा, जव्हार, मोखाडा इत्यादी आदिवासी पाडयांना भेटी देवून त्यांना कपडे, धान्य, मिष्टान्न, औषधे, शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य अशा जीवनावश्यक गोष्टींचे ते वाटप करतात. विविध सणांच्या प्रसंगी ते या आदिवासी वस्त्यांमधील मुलांसोबत राहून आनंद द्विगुणित करतात. सरकारच्या कल्याणकारी योजना आदिवासी जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सोन्या पाटील यांच्याकडून झालेला दिसून येतो.
विद्यार्थ्यांमध्ये खिळाडू वृत्तीचा व विविध कलांचा विकास व्हावा यासाठी मॅरेथॉन स्पर्धा, चित्रकला, निबंध, नृत्य, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे . एक कुशल व्यावसायिक आणि उद्योगाचे मालक असण्यासोबतच, अनेक सामाजिक, शैक्षणिक तसंच सांस्कृतिक व उद्योग संस्थांचे अध्यक्ष व महत्त्वाची पदं सोन्या पाटील यांनी भुषवली आहे.
Leave a Reply