पाणी हे जीवन. मात्र हेच पाणी कधीकधी रौद्र रुप धारण करते. पुर होत्याचे नव्हते करुन टाकतो. एकीकडे पुरापासून जीव वाचविण्यासाठीचा संघर्ष आणि दुसरीकडे जगण्यासाठी पिण्याचे पाणी मिळवायची धडधड सुरु असते. पाणी शुद्ध करण्यासाठी जगभरात वैविध्यपूर्ण तंत्रज्ञान उपलब्ध आहे. पण ग्रामीण भागातील गरजेचे काय? नेमका हाच प्रश्न सुभाष आंदे यांना पडला आणि त्यांनी त्यावर उत्तर शोधले, ‘नीरी-झर’. गावातल्या माणसालाही पुराचे गढूळ पाणी शुद्ध करता येईल. अशी ही सोपी पद्धत आज जागतिक मान्यता मिळवू पाहतेय.
सुभाष आंदे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला स्त्रोत ‘नीर-झर’ चा हा लेख पुढील पानावर वाचा.
1 2
Leave a Reply