
एका दशकापेक्षा ही अधिक काळात सुबोध भावे यांनी नाटकं, दूरचित्रवाणी-मालिका, चित्रपट अशा सर्व दृकश्राव्य माध्यमातून सहज सुंदर आणि ओघवत्या अभिनय शैली मुळे रसिक मनावर अधिराज्य केलं. मराठी चित्रपटाचा नायक आणि खलनायिकी भूमिका त्यांनी समर्थपणे पेलल्या. पण सुबोध भावेंच्या कारकीर्दीतील महत्वाचा “टर्निंग पॉइंट” ठरला तो म्हणजे २०११ साली प्रदर्शित झालेला “बालगंधर्व”हा चित्रपट.
या चित्रपटात बालगंधर्व उर्फ श्रीपाद नारायण राजहंस यांची भूमिका पडद्यावर हुबेहूब साकारुन राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर ही वा…व्हा… मिळवली. हा “बालगंधर्व” सिनेमा साकारताना बालगंधर्व यांच्या जीवना विषयी बरचसं अभ्यासावं लागलं होतं, ही भूमिका “हीट” ठरण्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे “नाट्य संगीताचा अभ्यास व कट्यार काळजात घुसली” या संगीत नाटकात अभिनय .
“कळा लागल्या या जीवा”, “लेकुरे उदंड झाली”, “येळकोट”, “मंतर”, “आता दे टाळी”, “स्थळ स्नेह मंदिर”, सारख्या व्यावसायिक नाटकांमधून सुबोध भावेंनी अभिनय केला आहे. रुपेरी पडद्यावर “क्षणोक्षणी”, “मिशन चॅम्पीयन”, “मी तुझी तुजीच रे”, “आम्ही असू लाडके”, “श्री सिद्धीविनायक महिमा”, “सखी”, “सनई चौघडे”, “एक डाव धोबी पछाड”, “मन पाखरु पाखरु”, “रानभूल”, “पाऊलवाट”, “भारतीय”, “लाडीगोडी”, “ती रात्र”, “हापूस”, “उलाढाल”, “चिंटू”, “कवडसे”, “क्षण”,“ध्यासपर्व”, यांसारख्या वेगळ्या विषयांच्या अशा ५० चित्रपटांत अभिनय केला आहे.
सुबोध भावेंना २००८ साली रानभूल, तर २०११ साली प्रदर्शित झालेल्या बालगंधर्व चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले. अलिकडच्या काळात “बालक-पालक” (बी.पी.) आणि राणी मुखर्जी सोबत “अय्या” या चित्रपटातनं सुबोध भावेंनी दर्जेदार भूमिका साकरल्या आहेत. तर दूरचित्रवाणी मालिकांमध्ये “क्राईम डायरी”, “ऋणानुबंध”, “अभिलाषा ”, “दामिनी”, “पिंपळपान”, “आभाळमाया”, “पेशवाई”, “वादळवाट”, “कळत नकळत”, “अकलपीत”, “कुलवधू” ह्यांचा समावेश असून सुबोध भावे या मालिकंमधून मध्यवर्ती भूमिकेत झळकले आहेत.
Leave a Reply