सुहास भालेकर

Suhas Bhalekar

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर यांनी सहा दशकांहून अधिक काळ नाटक, मालिका, तसंच रुपेरी पडदा गाजवला. कीर्तनकार वडिलांकडून आलेली शुद्ध वाणी, तसंच आई कडून या क्षेत्रात काम करण्यासाठी मिळालेलं पाठबळ यामुळे त्यांच्यातील कलाताराला आपसूकच प्रोत्साहन मिळत गेलं.

१९६० ते १९७६ या सोळा वर्षांच्या कालखंडात त्यांनी शाहीर साबळेंबरोबर काम केलं.जवळपास ६० हून अधिक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका करून नाटय़क्षेत्रात प्रदीर्घकाळ आपला ठसा उमटवलाला “पंतांची सून”, “युद्धांच्या सावल्या”,”एकच प्याला”,”तुझे आहे तुजपाशी”,”अंमलदार”,”मी मंत्री झालो”, “बेबंदशाही”,”सासरे बुवा जरा जपून”,”राजकारण गेलं चुली”,”फुटपायरीचा सम्राट”, “सारांश”,”चक्र”;अशा अनेक नाटकातल्या त्यांच्या भूमिका गाजल्या.”असंभव” या मालिकेतील “सोपानकाका” ही भूमिका प्रेषकांच्या कायम लक्षात राहिलं. त्याचबरोबर “गोट्या भाकरी आणि फूल”,”कशाला उद्याची बात”,”वहिनी साहेब”,या मालिकेतील त्यांनी साकारलेल्या भूमिका लक्षणीय ठरल्या.

तळीराम तर “झुंज”,”चानी”,”लक्ष्मी”,”शापित”,”भुजंग”,”गंमत-जंमत”,”बाळाचे बाप ब्रह्म्चारी”,”बोडक्याचा बाजीराव”,”झंजावात”,”आई”,”निवडुंग”,”अष्टविनायक”,”येड्यांची जत्रा” या मराठी सिनेमातल्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.

 बारीक अंगकाठी असल्याने केवळ विनोदी भूमिका वाट्याला येणारे भालेकर यांनी आपल्या अभिनयकौशल्याने अलेल्या संधीचे सोने केले. आणि मुलाचे स्वप्न समजून घेणारी आई यांच्यामुळे मराठी कलासृष्टीला सुहास भालेकरांच्या रुपानं हरहुन्नरी कलावंत लाभला.
२ मार्च २०१३ या दिवशी, म्हणजे वयाच्या ८३ व्या वर्षी फुफ्फुसाच्या अल्पश्या आजाराने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले.
(लेखक : सागर मालाडकर)

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर (5-Mar-2017)

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर (12-Nov-2017)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*