
जगप्रसिद्ध क्रिकेटपटू. भारताचे माजी कर्णधार. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते. भारतीय संघातर्फे त्यांनी १२५ कसोटी सामने खेळून ५१.१२ धावांच्या सरासरीने एकूण १०,१२२ धावा काढल्या.
सुनील गावसकर यांचा जन्म १० जुलै १९४९ रोजी झाला. त्यांचे वास्तव्य मुंबई येथे असते.
सचिन तेंडूलकरच्या ऊदयापूर्वी सुनिल गावस्कर यांना भारतीय संघाचे लिटल मास्टर म्हणून संबोधले जात असे. आता ते विविध वाहिन्यांवर क्रिकेट समालोचकाची भूमिका पार पाडतात.
त्यांनी मराठी चित्रपटातही काम केले आहे.
## Sunil Gavaskar
Leave a Reply