सुनिता देशपांडे ह्यांनी पु. ल. देशपांडेंच्या जीवनपटलावरती धावती नजर फिरवणारे, व त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे “आहे मनोहर तरी” या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्राची तमाम मराठी साहित्यप्रेमींकडून दाद मिळाली.
१२ जुन १९४६ साली पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पुलं सोबत विवाहबध्द होउन पुढे संसाराची धुरा आनंदाने व यसस्वीरित्या पेलली “सोयरे सकाळ”, “प्रिय जी.ए.”, “समांतर जीवन”, “मण्यांचीमाळ”, याशिवाय “मनातलं अवकाश” हा सुनिता देशपांडे यांचा लेखसंग्रह, २००४ ते २००६ दरम्यान विविध वर्तमान पत्र तसेच दिवाळी अंकांमधुन प्रसिध्द झालेल्या लेखाचं पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरले.
यासोबतच अनेक विषयावरील दर्जेदार पुस्तके व कादंबर्या लिहून सुनिता देशपांडे यांनी चौकस व प्रतिभावंत लेखिका म्हणुन स्वत:ची ओळख मिळविली आहे .
७ नोव्हेंबर २००९ रोजी सुनिता देशपांडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.
(लेखन व संशोधन – सागर मालडकर)
अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.
सुनीता देशपांडे (7-Nov-2016)
लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे (3-Jul-2017)
मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे (3-Jul-2018)
Leave a Reply