अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी करुन गेली ५५ ते ६० वर्षे अविरत तबलावादन करुन रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तबलावादकांमध्ये ज्येष्ठ म्हणून आदराने ओळखले जाणारे ठाणेकर सुरेश तथा भाई गायतोंडे हे ठाण्यातील एक कलारत्न होय! पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे १८ वर्ष आणि पं. अहमदजी थिरकवां यांच्याकडे ३ वर्षं, पं. विनायकराव घोंग्रेकर यांच्याकडे १० वर्षं आणि पं. लालजी देशमुख यांच्याकडे १८ वर्षे अशी गुरुजनांकडून प्रदीर्घ काळ तबल्याचे शिक्षण भाईंनी घेतले आणि अजूनही घेत आहेत. १९५५ साली मुंबईत पहिला कार्यक्रम झाला तेव्हापासून मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, कानपूर, लखनौ, बंगलोर, हैद्राबाद असे भारतभर आणि इंग्लंड, अमेरिका, सिंगापूर, नेपाळ असे भारताबाहेर त्यांनी अनेक कार्यक्रम आजवर केले आहेत. १९६४ साली ठाण्यातील जी.एस.बी. मंडळातर्फे “स्वरविलास” संस्था स्थापन करुन ठाण्यातील तसेच भारतातील प्रतिथयश कलाकारांचे कार्यक्रम सादर केले. तसेच ठाण्यातील नवोदितांनाही या संस्थेतर्फे संधी दिली गेली.
पुरस्कार : त्यांच्या तबलावादनातील योगदानाबद्दल त्यांना आजवर कोकण कलाभूषण, संगीत-नाटक अकादमी, संगीत कलारत्न, गुरुसन्मान आणि पं. राम मराठे स्मृती सन्मान असे अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे.
Leave a Reply