
स्वानंद कुलकर्णी हे महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेतील नामांकित नाव. साम मराठी, एबीपी माझा, टी.व्ही ९ महाराष्ट्र आणि झी २४ तास अश्या वृत्तवाहिनी मध्ये पत्रकार तसंच निर्माता या पदावर काम केले होते. मुळ पुण्याचे असणार्या स्वानंद कुलकर्णी यांचा जन्म २० एप्रिल १९८५ चा. एस.पी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेल्या स्वानंद कुलकर्णी हे माध्यम क्षेत्रातल्या नोकरी निमित्त मुंबईत दाखल झाले होते.
झी २४ तास वाहिनीवर प्रोड्युसर या पदावर असताना आषाढीची ‘आनंदवारी’ सर्वोत्तम पद्धतीनं कव्हर केली. उत्तम आवाजामुळे तसंच नाट्य व संगीताची जाण असल्यामुळे अनेक बुलिटिन्स उत्तमरित्या व खुबीने सादर केली होती.
१० नोव्हेंबर २०१४ या दिवशी जिम मध्ये व्यायाम करत असताना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला डोंबिवलीच्या ओम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या २९व्या वर्षी त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यासोबतच तळमळीने कार्यरत असलेला पत्रकार गमावल्याची भावना निर्माण झाली आहे .
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
Leave a Reply