दस्तुर, (डॉ.) के. एन.

हृद्य ही मानवाला मिळालेली सर्वात अमुल्य व कलात्मक भेट आहे. सामान्य माणसाला कवित्व देणारे, विवीध भावनांचे पितृत्व स्वीकारणारे, यंत्रांच्या गर्दीमध्ये हरवत चाललेल्या व्यक्तींना संवेदनांचे व हळुवार जाणीवांचे शहारे देऊन त्याला माणुस म्हणून जगण्यास प्रवृत्त करणारे, व त्याच्यातील ‘दर्दीपण’ जोपासणारे हृद्य जेव्हा त्याच्या तांत्रिक बाबींमध्ये गुरफटते तेव्हा नश्वर देहाची परलोक यात्रा सुरू होते. परंतु आज वैद्यकीय क्रांतीमुळे दुर्मिळ हृद्यविकारांवर देखील औषधे व शस्त्रक्रिया जन्मास आल्या आहेत.
[…]

दिघे, दत्तात्रय केसरीनाथ (द. के. दिघे)

दत्तात्रय केसरीनाथ दिघे यांचा  जन्म मुंबई येथील बारभाई मोहल्ला या मुस्लिम वस्तीत दि. १८ मे १९१९ रोजी झाला. वयाच्या विसाव्या वर्षापासून त्यांनी विविध शासकीय कार्यालयात इंग्रजी लघुलिपी लेखक (stenographer) म्हणून ३७ वर्षे काम केले. सन १९७७ […]