शिलेदार, जयमाला

२१ ऑगस्ट १९२६ साली पेण येथे जन्मलेल्या जयमालाबाईंचं माहेरचं नाव प्रमिला जाधव होतं. त्यांचे वडील नारायणराव जाधव हे मुंबईत वास्तव्यास होते.पण मुंबईच्या गोदीला आग लागल्यानंतर अनेक कुटुंबांनी मुंबई सोडून अन्यत्र स्थलांतर केले, त्यावेळी जाधव यांनीही आपल्या कुटुंबासह बेळगावात स्थलांतर केले. मास्तर कृष्णराव , गोविंदराव टेंबे आणि गानसरस्वती मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे त्यांनी गायकीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले.
[…]