MENU

मोहन दाते

१९९५ साली धुंडीराजशास्त्रींचे निधन झाल्यानंतर ‘दाते पंचांग’ चालविण्याची जबाबदारी मोहनराव दाते यांच्यावर पडली. तेव्हापासून आतापर्यंत मोहनराव ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत हे दाते पंचांगाच्या लोकप्रियतेवरून दिसून येतच आहे. […]

मोहन जोशी

‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले. ’कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक. मोहन जोशी यांनी मराठी, हिंदीसह भोजपुरी आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी आजपर्यंत २५० चित्रपटात काम केले आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. […]

मोहन गोखले

घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत लीलया मोहन गोखले वावरले. […]

मोरोपंत उर्फ मोरेश्वर रामचंद्र पराडकर

पराडकर कुटुंब हे मूळचे कोकण येथील सौंदळ गावचे. मोरोपंताचे पणजे रामजीपंत हे नौकरीच्या निमित्ताने कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले. रामजीपंताचे नातू रामचंद्रपंत हे मोरोपंताचे वडील. ते कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंताचे बालपण तिथेच गेले. […]

मोरो केशव दामले

“शास्त्रीय मराठी व्याकरण” हा सुमारे एक हजार पृष्ठांचा ग्रंथ मोरो केशव दामले यांनी लिहिला. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांस आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथात असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले आहेत. हे व्याकरणाच्या क्षेत्रातील मोठे काम म्हटले गेले. […]

मोरेश्वर वासुदेव उर्फ बंडोपंत सोलापूरकर

बँड संस्कृती रुजवण्यात महत्त्वाची भूमिका असलेलं अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून बंडोपंत सोलापूरकर यांची ख्याती होती. त्यांनी बँडची संस्कृती नुसती रुजवलीच नाही, तर तिला प्रतिष्ठा मिळवून दिली. […]

मोरेश्वर घैसास गुरुजी

मोरेश्वर घैसास गुरुजी यांचे वडील प्रसिद्ध ऋग्वेदी, घनपाठी वेदमहर्षी विनायकभट्ट हरिभट्ट गुरुजी यांनी आपल्या पुढील पिढीलाही वेदांच्या अध्ययनाचा वारसा दिला पाहिजे, या विचारातून त्यांनी पुण्यात राहण्याचे निश्चित केले. सदाशिव पेठेत स्वतःच्या राहत्या खोलीत त्यांनी वेदपाठशाळा सुरू केली. दोन विद्यार्थ्यांना घेऊन १५ ऑक्टोबर १९४५ मध्ये त्यांचे अध्यापन सुरू केले. […]

मेघराजराजे भोसले

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या मेघराज राजे भोसले यांनी १९९७ मध्ये ‘पांडव एंटरप्रायजेस’ या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करून ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘मास्तर एके मास्तर’, ‘डंक्यावर डंका’, ‘संत वामनभाऊ’ या चार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. […]

मेघना एरंडे

निंजा सगळी लहान मुलं बघतात याचं भान ठेवावं लागतं. शिनचॅनचं ‘इतनी भी तारीफ मत करो’ हे लोकप्रिय वाक्य किंवा निंजाचा ‘डिंग डिंग डिंग’हा आवाज कानावर पडला, की सगळ्या बच्चे कंपनीच्या टीव्हीवर उड्या पडतात. […]

मेघश्याम पुंडलिक रेगे

भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही तत्त्वज्ञानांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. या दोन्ही विचारपरंपरांची अतिशय साधार, स्पष्ट आणि विश्लेषणात्मक मांडणी करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. रेगे यांच्याविषयी महाराष्ट्रातील लेखन-वाचन व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांना नितांत आदर आणि कुतूहल असते. […]

1 4 5 6 7 8 80