कान्हेरे, अनंत

अनंत कान्हेरे हे मूळचे औरंगाबादचे. त्यांचे शालेय शिक्षण हे बरेचसे औरंगाबाद येथेच झाले, परंतु नंतर ते शिक्षणासाठी नाशिक येथे झाले. जुलमी इंग्रज अधिकारी जॅक्सनच्या हत्येची शिक्षा म्हणून त्यांना फाशी देण्यात आले. […]

जोग, रा. श्री.

साहित्य मीमांसक, कवी आणि एक विचारवंत म्हणून रा. श्री. जोगांची ओळख आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज या गावी १५ मे १९०३ रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद बाजी जोग हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. रा. श्री. जोग यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले. […]

साळगावकर, जयंत

लेखक, संपादक, प्रकाशक, ज्योतिषतज्ज्ञ आणि सातासमुद्रा पार गेलेल्या अनेक भाषांतून प्रकाशित होणार्‍या ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेचे सर्वेसर्वा म्हणजे ज्योर्तिभास्कर जयंत शिवराम साळगावकर. साळगावकरांचा जन्म १ फेब्रुवारी १९२९ रोजी सिंधुदुर्ग तालुक्यातील मालवण या गावी झाला.
[…]

गोखले, बापू

अतिशय शूरवीर असे मराठेशाहीचे शेवटचे सेनापती म्हणून ओळखले जातात ते म्हणजे बापू गोखले. कोकणातील तळेखाजण या गावी बापू गोखले यांचा जन्म झाला. बापू गोखले यांचे मूळ नाव नरहर गणेश गोखले.
[…]

लक्ष्मीबाई टिळक

एक अतिशय वेगळ्या प्रकारचे, विरोधाभासाने गुंफलेले लक्ष्मीबाईंचे आयुष्य त्यांच्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्रातून समाजासमोर आले आणि ‘युद्धस्थ कथा रम्या’ पद्धतीने लिहिलेले त्यांच्या स्मृतिचित्रातील एक एक चित्र वरवर हलक्या फुलक्या पण आतून दाट गहिर्‍या रंगाने रंगलेले सार्‍या महाराष्ट्राच्या मनावर विराजमान झाले.
[…]

गुजर, सरसेनापती प्रतापराव

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याचे धोरण बांधले आणि हिदवी स्वराज्य स्थापन केल्यावर जी नवरत्ने घडवली त्या प्रत्येकाच्या कर्तृत्वाला इतिहासात तोड नाही.
[…]

ढेरे, (डॉ.) अरुणा

मोठ्या वृक्षाच्या सावलीत छोटी रोपं आपली वाढ हरवून बसतात, असं म्हणतात! पण केळीची जनरीतच वेगळी. तिच्या गाभ्यातूनच नवी केळ जन्मला येते, तिचंच रंगरूप घेऊन. अरुणा ढेरे यांचं अस्तित्व असं आहे. त्याही थेट आपल्या वडिलांचेच गुण घेऊन जन्माला आल्या आहेत.
[…]

बापट, गोविद शंकर

भाषांतरकार, संस्कृतचे व्यासंगी पंडित म्हणून त्या काळात प्रसिद्ध असलेले गोविद शंकर बापट यांचा जन्म ८ फेब्रुवारी १८४४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे झाला. त्यांचे वडील हे व्युत्पन्नशास्त्री होते.
[…]

1 75 76 77 78 79 80