ऐश्वर्या नारकर

व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचं पहिलं नाटक ‘ गंध निशिगंधाचा ‘ हे होतं. पुढे त्यांनी अनेक नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचं गारुड , रसिक प्रेक्षकांच्या मनावर केलं. त्यातील सध्या चर्चेत असलेलं सोयरे सकळ ह्या नाटकात त्यांनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. […]

अमृता खानविलकर

अमृता खानविलकर हे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींपैकी एक बहुचर्चित नाव आहे. तिने आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. […]

चिटणीस, इंदिरा

तब्बल ११२ चित्रपटांमधून तसंच १५ नाट्यप्रयोगातून इंदिरा चिटणीस यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेल्या कजाग, खाष्ट सासुच्या भुमिकांची दखल ही नोंद घेण्यासारखी आहे.भालजीं पेंढारकरांच्या “थोरातांची कमळा” या
चित्रपटातील भूमिकेसाठी इंदिरा चिटणीस यांना राज्य शासनाच्या “सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेत्री” तर गरिबाघरची लेक या चित्रपटासाठी “सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री”च्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
[…]

वत्सला देशमुख

वत्सला देशमुख या मराठी रंगभूमी तसंच चित्रपटातील अभिनेत्री असून हिंदी-मराठी चित्रपटांमधुन विविधांगी व चारित्र्य संपन्न अभिनेत्री तसंच सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. […]

शिरोमणी, सुषमा

मराठी चित्रपटांमध्ये पारंपारिक स्त्री व्यक्तीरेखेला काहिसा छेद देऊन त्याजागी “डॅशिंग वुमन” आणि “तडफदार स्त्री” ची व्यक्तीरेखा साकारण्याचं काम सुषमा शिरोमणी यांनी चपलखपणे साध्य केलं; मराठी सिनेमामध्ये सर्वप्रथम “भिंगरी” या चित्रपटातून “आयटम सॉंग” चा ट्रेंड हा सुषमा शिरोमणींमुळे रुजला आणि तोही मराठमोळ्या ढंगात. चित्रपटांच्या निर्मिती व्यतिरिक्त सुषमा शिरोमणींनी “इम्पा” या चित्रपटांसाठीच्या संघटनेचं तीनवेळा अध्यक्षपद भुषवलं असून, पायरसी विरोधी कायदा हा त्यांच्या कार्यकाळातच अमलात आला.
[…]

हुबळीकर, शांता

एकेकाळी सार्‍या भारतभर लोकप्रियता मिळवणा-या शांता हुबळीकरांची वैयक्तिक आयुष्यात लहानपणापासुनच चढउतार येत होते.आयुष्याचा उत्तरार्ध तर खुपच हालाखीचा होता.झगमगत्या जगापासून आणि स्वकियांपासून दूर अनेक वर्षे आश्रमात राहून अज्ञातवासातच काढली तेही एका अनाथाश्रमात.
[…]

पैंगिणकर, इंदूमती

भावपूर्ण आणि लाघवी चेहरा, बोलके डोळे, उंच तसंच शिडशिडीत बांधा असंच काहीसं वर्णन इंदूमती पैंगिणकर यांच्या व्यक्तिमत्वाचं करता येईल. अभिनयासोबतच लेखिका म्हणून त्यांनी मिळवलेली ओळख ही सुद्धा त्यांचा महत्वाचा पैलू असल्याचं सांगते.
[…]

देशमुख, रंजना

१९७०-८०च्या दशकांत अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमधून रंजना देशमुखांनी विविधांगी भुमिका साकारल्या. रंजना देसमुख यांचे इतर प्रमुख चित्रपट म्हणजे ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’, आणि ‘चानी’
[…]