अशोक समर्थ

अशोक समर्थ ! हिंदी , भोजपुरी तसेच मराठी सिनेसृष्टीतील एक कमी वेळात नावाजलेलं नाव. अशोक समर्थ ह्याचा जन्म बारामती सारख्या लहान पण तितक्याच महत्वाच्या गावात झाला. अशोक समर्थचे लहानपणापासूनच एक यशस्वी कलाकार , अभिनेता बनण्याचे स्वप्न होतं. ते त्याने मेहनत घेत पूर्णही केलं. […]

अनंत जोग

अनंत जोग – मराठी , हिंदी चित्रपट सृष्टीतील गाजलेला खलनायक. आतापर्यंत अनंत जोग यांनी  अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात कामं केली. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मध्ये त्याने खलनायकाचे वेगवेगळे पैलू त्याच्या अभिनयातून दाखवून दिले. […]

अनंत आत्माराम काणेकर

मराठी विषयाचे प्राध्यापक असणार्‍या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत आपलं लेखन पोहोचवलं. “चित्रा” या साप्ताहिकाचे संपादक म्हणून ही अनंत काणेकरांनी काम पाहिलं.
[…]

ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल 

प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल  हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. तोरडमल यांना ‘मामा’ या नावाने संबोधले जायचे. कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा […]

अभिनेते दादा कोंडके

दादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. विनोदी ढंगातील द्वि-अर्थी संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या जवळपास सर्वच भूमिका लोकप्रिय झाल्या. […]

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी

आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम् डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. […]

आनंद मोडक

आपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक यांनी आपल्या गावालाच शाळेत शिक्षण घेतले. तेथेच त्यांनी संगीताचे धडे गिरवले. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याची वाट निवडली. पीडीएच्या घाशिराम कोतवालमधून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. सतीश आळेकरांच्या “महानिर्वाण” या नाटकाने त्यांना संगीतकार चख्याती मिळवन दिली.
[…]

पार्श्वगायिका आशा भोसले

आपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले यांचा लौकिक आहे. प्रदीर्घ काळ अनेकविध प्रकारची गीतं आपल्या सहज शैलीत गाऊन चिरतरुण, चतुरस्त्र गायिका म्हणूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली. […]

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व […]

माणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)

“इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण केले होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते, तर “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा”चे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते. […]

1 2 3 4