राजाभाऊ चितळे
मराठी माणसाकडे व्यावसायिक बुध्दी नाही किंवा त्याच्याकडे इतर ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी लागणारे संभाषण चातुर्य व व्यवसाय फोफावण्यासाठी लागणारी मेहेनती वृत्ती नाही अशा विधानांना छेद देणारे अनेक मराठी व्यावसायिक महाराष्ट्रात, भारतात, व जगात होवून गेले आहेत.
अतिशय उत्तम चव व दर्जा, रास्त किंमत, निरनिराळ्या सण समारंभांसाठी लागणार्या मिठाई, पक्वानांची व इतर पदार्थांची भरपुर रेलचेल, व टिकाऊपणा या मुलभूत वैशिष्ठांच्या जोरावर चितळे गृह्द्योगाने आपले नाव सर्वसामान्य नोकरदार माणसाच्या ह्रद्यावर कोरले आहे. कुठलाही सण असो वा कार्यक्रम, कुठे सहल जाणार असो किंवा अचानक पाहुणे येणार असोत, प्रत्येक मराठी माणसाची पाऊले ही आपसुकच चितळेंच्या दुकानाकडे वळतात. इतके वर्ष जपलेला घरगुतीपणा व त्याला दिलेला व्यावसायिकतेचा हळुवार स्पर्श ही चितळेंच्या मिठाईची खासियत.
[…]