पुराणिक, रश्मी
रश्मी पुराणिक ह्या ई टी. व्ही. या आघाडीच्या वाहिनीवरील बातमी सदरामध्ये रिपोर्टर म्हणून काम करणार्या अतिशय चपळ व हुषार तरूण पत्रकार आहेत. पत्रकार म्ह्टला की त्याला समाजसेवकाचे अंग हे लागतेच. तळागाळातील महिला व पुरूष यांच्या खर्या, व वास्तवदर्शी जीवनांचे पारदर्शी चित्रण शहरी व सुसंस्कृत लोकांसमोर आणणे वाटते तेवढे सोपे काम नसते. त्यासाठी डोंगरदर्या पालथ्या घालुन दुरवरच्या गावांमध्ये निवासी व फलदायी मुक्काम करावा लागतो. तेथील लोकांच्या समस्या व दुःखे प्रत्यक्ष अनुभवावी लागतात, त्यांच्याशी कौशल्यपुर्ण पध्दतींनी संवाद साधावा लागतो.
[…]