मुजुमदार, रत्नाकांत व शांती

मिस्टर रत्नाकर व मिसेस शांती मुजुमदार हे पिट्सबर्ग मराठी मंडळाचे जेष्ठ व जुने सदस्य. या दोघांनी कार्नेगी मेलन विद्यापीठात वैज्ञानिक म्हणून काम केले आहे. वेगवेगळे असाह्य रोग व त्यांचे त्वरीत निदान व प्रभावी औषधोपचार कसे करता येतील या विषयांवर काम करत असताना त्यांनी कॅन्सर सारखा प्राणघातक रोग लवकरात लवकरपणे अचुक शोधू शकणारे रसायन शोधून काढले आहे. संशोधन करीत असताना अनेक रासायनिक पदार्थांचे विघटन व उत्खनन करून मुजुमदारांनी हजारोंना नवसंजिवनी देवू शकेल असे फ्लोरोसेंट डाईस ( जे आता साएनाईन डाईस या नावाने पेटंट केले गेले आहे ) हे अनोखे औषध तयार केले आहे. बहुतांशी, या विद्यापीठात केलेले संशोधन हे शैक्षणिक क्षेत्रातील एक अमुल्य ज्ञान म्हणून जतन केले जात असले तरी ते पुर्ण जगासमोर प्रसिध्द होत नाही. परंतु मुजुमदारांनी केलेल्या या संशोधनाची नोंद जगामधील सर्वात प्रतिष्ठीत अशा कॅन्सर रिसर्च व सिएट चिलड्रेन्स हॉस्पिटल रिसर्च इन्सटिट्युट नावाच्या जर्नलस् मध्ये करण्यात आली. मुजुमदारांनी केलेल्या कार्याचा जगभर सार्थ गौरव केला गेला व हे संशोधन नजिकच्या काळामध्ये कॅन्सर वर खात्रीलायक औषध तयार करण्यास फायदेशीर ठरेल अशी आशा सर्वांना वाटत आहे. मराठी माणसाच नाव वैद्यकिय क्षेत्रात पुर्ण जगभरात झळकवल्याबद्दल रत्नाकांत मुजुमदार व शांती मुजुमदार यांचे हार्दिक अभिनंदन.
[…]