अरविंद सावंत

अरविंद गणपत सावंत हे शिवसेनेतील राजकीय नेते आहेत. १९६८ मध्ये अरविंद सावंत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात गटप्रमुख ह्या पदापासून केली. स्थानिक लोकांच्या रोजगारासाठी मागणी करणाऱ्या स्थानीय लोकाधिकार समितीत ते सामील झाले. […]

आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे हे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांचे पुत्र असून पर्यावरण व पर्यटन मंत्री आहेत. […]

अनंत गीते

अनंत गंगाराम गीते हे एक राजकारणी आहेत. ते शिवसेना पक्षाचे सदस्य आहेत. अनंत गीते हे २०१४ – २०१९ ह्या काळात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रांतील उद्योगांचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री होते , तसेच ऑगस्ट २००२ – मे २००४ पर्यंत ते केंद्रीय ऊर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्री होते. […]

आनंद दिघे

आनंद दिघे हे ठाण्यातील नावाजलेलं राजकीय व्यक्तिमत्व होतं. त्यांना ठाणेकर नागरिकांकडून ‘ धर्मवीर ‘ ही पदवी प्राप्त झाली होती. आनंद दिघे ह्यांनी प्रचंड प्रमाणात समाजकार्य केलं आणि जनमानसात प्रचंड मान मिळवला. […]

सावंत, प्रकाश (बाळा सावंत)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते तसंच ठाकरे कुटुंबियांचे जवळचे स्नेही अशी प्रकाश सावंत उर्फ बाळा सावंत यांची ओळख होती. […]

तरे, महेश्वरी संजय

लहानपणापासून समाजकारणाची आवड असणार्‍या महेश्वरी तरे या ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ मधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून असलेल्या नगरसेविका आहेत. त्यांनी या पदावर आरूढ झाल्यापासून प्रभागातील अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. एक कार्यतत्पर व सामाजिक […]

ठाकरे, उद्धव

महाराष्ट्रातील अत्यंत आक्रमक आणि सर्वाधिक लोकाधार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख
[…]

चव्हाण, नीलेश

नाशिकच्या राजकीय क्षितीजावर ज्या झपाट्याने नीलेश चव्हाण हे नाव उदयास आले तितक्यात वेगाने हा उमदा तरुण जीवनपटावरून अस्तंगत होईल, याची कुणी कल्पनाही केली नसावी. […]

शिंदे, एकनाथ

शिवसेनेची मुळे ही ठाण्यामधील प्रत्येक जागेत रूजविण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा सहभाग आहे. सुरूवातीस साधे शिवसैनिक, व मग आमदार, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि आता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अशा एका मागोमाग एक शिडया चढलेल्या एकनाथ शिंदेनी नेहमीच त्यांच्या मतदात्यांच्या आकांक्षाचा व रास्त अपेक्षांचा प्रामाणिक पाठपुरावा केला आहे. […]