कुलकर्णी, श्रीनिवास
उजव्या कोप-यात गंगाखेड, परभणी असे लिहिलेले भरगच्च मजकुराचे पोस्टकार्ड उभ्याआडव्या महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही क्षेत्रात चळवळ्या असलेल्या कोणाहीकडे आले की ते श्रीनिवास कुलकर्णी यांचेच आहे हे क्षणात उमगायचे. वास्तविक श्रीनिवासचे मूळ गाव लातूर. तरुण वयातच आईवडिलांचे छत्र हरपले. पण व्यक्तिगत दु:खात ते कधीच हरवले नाहीत.
वेठबिगार प्रथेविरोधात देशव्यापी आंदोलन छेडलेल्या स्वामी अग्नीवेश यांचे नाव सत्तरच्या दशकात गाजत होते. १९७३ साली औराद शहाजनी येथे झालेल्या आर्य युवक परिषदेच्या शिबिराच्या निमित्ताने श्रीनिवासांना स्वामीजींशी संपर्क साधता आला. त्यानंतर आपले पुढील आयुष्य दलित कष्टकरी वर्गातील अन्यायाविरोधात पणाला लावायचे हे त्यांनी पक्के ठरवून टाकले.
[…]